Ad will apear here
Next
‘जीवसृष्टीवरील परिणामाच्या अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त’
पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो,’ असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेतील पहिल्या पुष्पात डॉ. बोरकर ‘जीवाश्म माझ्याशी काय बोलले’ या विषयावर बोलत होते. या प्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र परदेशी, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विद्याधर बोरकर म्हणाले, ‘गेली पाच दशके भारतीय द्वीपकल्पातील विविध पाषाणसमूहांमधे आढळणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास करत असताना अनेक स्वारस्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळाल्या. साडेसत्तावीस कोटी वर्षांपूर्वी सागरी प्राण्याच्या मादीने केलेल्या भ्रूणकोष्टाचे अवशेष सापडले. त्यावरून अंड्यांच्या संरक्षणासाठी बिळे करण्याची प्रवृत्ती किती पुरातन आहे, हे दिसून आले. प्राण्यांची त्रिस्तरीय रचना समजली. मासे, बेडूक, शिंपले, विविध प्रकारचे खडक यावरून जीवसृष्टी अभ्यासण्यात मदत झाली. सागरी मासे नदीच्या प्रवाहाच्या विरोधात प्रवास करून सरोवरात कसे येतात, हे अभ्यासात आले. परदेशी व भारतीयांच्या मनात जीवाश्मांविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या आणि आहेत.’

प्रा. विनय म्हणाले, ‘आयसरबरोबर विज्ञानगप्पाचे पहिले सत्र यशस्वी झाल्यानंतर आता फर्ग्युसन महाविद्यालयासोबत या गप्पा होणार आहेत. विविध शास्त्रज्ञांशी गप्पा मारण्याची संधी या व्याख्यानमालेतून विज्ञानप्रेमींना मिळत आहे. मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबवित आहे.’

नानाविध ठिकाणच्या पाषाणस्तरातून त्यांनी शोधलेले जीवाश्म, त्यांच्या शोधाच्या कथा आणि त्यांच्या अभ्यासावरून निष्कर्ष का आणि कसे काढले यांची माहिती जाणून घेताना विज्ञानप्रेमींमध्ये कुतूहल दिसून आले.

प्रा. रवींद्र परदेशी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. नीता शहा यांनी सूत्रसंचालन केले. संजय मालती कमलाकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUABK
Similar Posts
डॉ. बोरकर यांच्याशी जीवाश्मांवर ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगप्पां’ची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिले व्याख्यान १२ जानेवारी रोजी होणार आहे.
प्रा. नलावडे यांच्याशी ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेत प्रा. संजीव नलावडे संवाद साधणार आहेत.
विज्ञानगप्पा पुणे : ‘बहिरेपणामुळे व्यक्तीच्या सामाजिक प्रगतीमध्ये अडथळे येतात. चांगले शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील इतर संधी त्यांच्यापासून दुरावतात. अनेकदा बहिरेपणाचा फायदा घेऊन, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतले, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बहिरेपणाची तीव्रता कमी होऊ शकते,’ असे प्रतिपादन मुंबईतील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ
‘डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी वापरावी’ पुणे : ‘परिसरात, घरात साठलेल्या पाण्यामध्ये, अस्वच्छ्तेच्या ठिकाणी, भाताच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर डास वाढतात. कळत नकळत ते आपल्याला चावतात. यातून हिवताप, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुणिया, झीका अशा गंभीर रोगांचा प्रसार होतो. डास हा माणसाचा मोठा शत्रू असून, या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण आणायचे असेल, तर डासांपासून बचाव करता आला पाहिजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language